वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

ऐका हो भोळे भाविक जन

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080985 · अभंग क्र. २२

22.
ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण ।
होईल दोषांचे दहन । गुरुचे स्मरण केलिया ॥
गुरुसेवा घडे ज्यासी । कळिकाळ न बाधे त्यासी ।
त्यांनी साधिले मोक्षासी । गुरुचे स्मरण केलिया ॥
गुरु ज्ञानाचा आगरु । गुरु धैर्याचा मेरु ।
नौका नेईल पारु । गुरुचे स्मरण केलिया ॥
गुरु मायेचे मूळ जीव । गुरु मोक्षपदाचा ठाव ।
साध्य होती सर्व देव । गुरुचे स्मरण केलिया ॥
जय जय गुरु मायबापा । चुकवी चौऱ्यांशीच्या खेपा ।
बोधला ध्यातो निज स्वरुपा । पर ठायी लय लावुनी ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग