कुस्ती
291.
कुस्ती
कुस्ती खेळता कासाविसी । शेंबुड खरकटे नाकासी । करे घेऊनि सावकासी । आता बहु भितो यासी ॥१॥
आम्ही तुम्ही सवे जेवू । गाई वळावया जाऊ । त्याच्या मानेवर बुक्या देऊ । जवळ जावयासि आता भिऊ ॥२॥
नामा म्हणे चला जाऊ । हात जोडोनि उभे राहू । पाया पडूनि मागुनि घेऊ । जनी वनी तो कृष्ण ध्याऊ ॥३॥
