शुभ्र सिंधु वरती वरे
703.
शुभ्र सिंधु वरती वरेला लडीयावरी दाविती शोभा ॥
कर्ण विराजित शोभत सुंदर अद्भुत तेज उणे रविबिंबा॥
दुष्ट प्रसीध नसे मन स्वस्ति कथा करी व्यस्त पाहात रभा ॥
सांगत सर्व आपूर्व जनि हारि कथा परी व्यर्थ शुभा॥
टाळ मृदंगाविणे धृपदे मग मेळविती धन मानप्रतिष्ठा ॥
हींडती देशविदेश विशेषत नाम विकुनि ते दाविती निष्ठा॥
मंत्रउपासन सांगती साधन नाटक ते ठक मान्ये कनिष्ठा ॥
बहिणी म्हणे असे संत नव्हेति रे सांगतसे निजसज्जन ईष्टा॥
( शिऊर हस्तलिखित वा प्रकाशित गाथ्यांमध्ये नसलेली. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे इतिवृत्तातून मिळालेली. )
