संतनारायण प्रतक्ष जा
704.
संतनारायण प्रतक्ष जाणा : साधकासि जीवदान :
जयाचे स्मरणे जाति सर्व दोश वैकुंठ ते भुवण :
परंपरा हेचि कुळदेव आम्हा बोलति वेद आपण :
शुक वामदेव व्यास वसीष्ट निरंतर करू त्यांचे स्मरण रे या ॥१॥
संत आम्हा देव संत आम्हा देव संतचरण भाव जडला :
सदा नाम त्याचे उच्चारू वाचे हाचि करू जप भला :
नित्य स्नानसंध्या करू देवार्चन परम धर्म भक्त) ला :
गाउं नाचो नित्य करू हरीकथा आम्हासि तो सुखसोहळारे या॥धृ॥
सिद्ध रूषी मुनि शैव वैष्णव योगी मानुभाव जाणा :
गण गंधर्व क्षये किन्नर शडदर्शणाच्या खुणा :
जे जे भक्त कोन्ही होऊनि गेले न करवे त्याचि गणणा :॥
उच्चारिता वाचे वाढला ग्रंथ सकळा माझे लोटांगणरे या ॥२॥
व्यास ऋषि आणि वैष्णव भक्त अट्यासी सहस्र मुनि :
सुरनर पंन्नग भक्त अनेग मिळाले जे चक्रपाणी॥
तया संतासंता नमन माझे चौयुगामाजी जे ज्ञानि॥
भावभक्ति मने वाचा काया हे ठेवियेली त्याचे चरणिरे या ॥३॥
मुद्गल विष्णुदास आच्युताश्रम पाठकनामा रोहिदास :
मत्छद्र गोरेख सालया रसाळ चौभाशा सिद्धमुद्धेश :
मृत्युंजय आणि रेणुकानंदन विठावर बळसीद्ध नागेश :
मुकुंदराज आणि श्रीधर आवधूत सदा करू नामी घोशरे या ॥४॥
जनजसवंत एका जनार्दन भानुदास मिराबाई॥
जयदेव जाल्हण परमानंद जोगा नित्यानंदभक्त पाहि ।
कान्हया हरिदास भोजलिंग पोशा तुळसीदास नरसाबाई ।
कुर्मदास अंत देव भक्तजन आठवति माझा हृदई रे या ॥५॥
निवृत्ति सोपान ज्ञानदेव जाण मुक्ताई वटेश्वर :
काकोमडका बाळाजनका घोंका ।
चोखामेळा खेचर : परसा भागवत जनमैत्र नागा हरमा परम पवित्र :
बहिरोपिसा आणि कान्होपाठक उच्चारू हे निरंतर या ॥६॥
कबीर कान्हपात्र गोराकुंभार सांवता नरहरि सोनार :
नामा माहदा विठा नारा नामसेटी परम भक्त साचार :
जनी राजाई माता गोनाई हे जातिचि सिंपे साचार :
सदा माझे देही आठवति हे न पडे तयाचा विसररे या ॥७॥
नरसा मेथा आणि बाबा उदगीरीकर व्यंकटेश निंबाजी भक्त :
रामदास रामभक्त रंगावा दताबा स्मरावा नित्य :
सुबारण्य आणि निंबाजी हरीदास कृष्णाजी हृदयी स्मरत ।
ऐसे या कलयुगी आवतरले योगी त्याचे पाई दृढ चितरे या ॥८॥
कृष्णदास आणि केशवानंद सिवकल्याण या मूर्ति :
शंकर गोसावि देखीयेले डोळ दासावा कल्याण कीर्ति :
सीवाजी गोसावी माझा मी धाकला ज्याचा तो ध्यातसो चिति :
यैसे निजभक्त हृदई माझा वाहतसे नेणो किति ॥९॥
देवदास देवदत्त देवाजी देमयादत गोसावि :
बापुजिबाबा वल्ली आखुबाबा आठवति माजा जीवि :
सांगीतले संत गुप्त ही असति त्यासी न म ) स्कार भावी :
आता कोण उद्धरल्या स्त्रिया त्याचि नामे परिसावी ॥१०॥
लक्षुमि आथ सत्यभामा आदि नारी सहस्त्राही सोळा :
अहिल्या द्रौपदी सीता मंडोदरी तारा या बा उद्धरल्या :
पार्वति सावित्री आरूंधति या पाविनल्या घननिळा :
चुडाळ या देवाहुति पतिव्रता उद्धरल्या या सकळारे या ॥११॥
वेधव्य वाटुनी दीधल सजीण घरोघरी वाण पाहीलती
व तुका सेख मेहमद बनरवडी नानक यसारमा
बलभदास जयराम भक्तसुद्र रामीरामदास॥अ॥
याही वेगळे आसति शुष्टीवरी गुप्त अथवा उदास
संतनामावळी बहीणीचा जप तरता न लगती सायास ॥१२॥
संत बहिणाबाई अभंग गाथा समाप्त
