वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

त्रैलोक्य हिंडोनी भा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076368 · अभंग क्र. ५२३

523.
त्रैलोक्य हिंडोनी भागली विरक्ति ।
फार तिची शक्ति हीन जाली ॥१॥
मग तिचा केला अंगिकार संती ।
तेणे त्या महती थोर आली ॥२॥
भक्तिही सीणली कोन्ही अंगिकारा ।
न करिती निर्धारा कळो आले ॥३॥
बहेणि म्हणे धृति नाही तिसी ठाव ।
सांडोनिया गर्व आली येथे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग