आपुलिया दुःखे जैसे ह
519.
आपुलिया दुःखे जैसे होती क्लेश ।
इतरांचे चित्तास तेचिपरी ॥१॥
असे जे जाणती आपुले मानसी ।
संत निश्चयेसी वोळखावे ॥२॥
पराविया सुखे सुख मानी मनी ।
देखे जनी वनी जनार्दन ॥३॥
बहेणि म्हणे तोय तैसे त्यांचे मन ।
संतांचे लक्षण हेचि एक ॥४॥
