संतुष्ट मानसी सदा सर
518.
संतुष्ट मानसी सदा सर्वकाळ ।
हृदय निर्मळ जेवी गंगा ॥१॥
संत ते जाणावे ब्रह्मप्राप्ती लागी ।
धन्य तेचि जगी शरण त्यासी ॥२॥
सर्वभूती बुद्धि समान सारिखी ।
आपुली पारिखी चिंतू नेणे ॥३॥
बहेणि म्हणे द्वेत हारपूनी गेले ।
अद्वैत बिंबले ब्रह्म डोळा ॥४॥
