वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संत देखता दृष्टी ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076174 · अभंग क्र. ५७०

570.
संत देखता दृष्टी ।
वृत्ति जाली उफराटी ।
हारपल्या अवघ्या गोष्टी ।
पडिले मौन ॥१॥
दृश्याचे लोपले भान ।
द्वैताचे उठले ठाण ।
ब्रह्मानंदसुखे गगन ।
भरोनी ठेले ॥२॥
मनासी जाहले ठक ।
डोळीया पडले टक ।
देखोनि अखंड एक ।
स्वरूप डोळा ॥३॥
शब्द निःशब्द झाला ।
निवृत्तीसी सामावला ।
सुमनाचा ध्यास तुटला ।
जयाचे ठायी ॥४॥
बहिणीस लागता संतसंग ।
संतप्रेमा अंतरंग ।
सकळाचा होऊनी भंग ।
अखंड ठेली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग