वाटे उठो नये जीव जाय
569.
वाटे उठो नये जीव जाय तरी ।
सुख ते अंतरी हेलावले ॥१॥
आनंदे निर्भर होऊनिया मन
करू आले स्नान इंद्रायणी ॥२॥
घेतले दर्शन पांडुरंगमूर्ती ।
तव झाली स्फूर्ति वदावया ॥३॥
तुकोबासी तेथे करूनि नमस्कार ।
आले मी सत्वर बिर्हाडासी ॥४॥
बहिणी म्हणे जैसा लोटला समुद्र ।
हृदयाकाशी चंद्र बोले वाचा ॥५॥
