वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

माझिये मनींचा जाणा ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-080729 · अभंग क्र. ३४५६

3456.
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालो आता ॥१॥
तुजविण दुजे न धरी आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥
ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥२॥
जीवभाव तुझ्या ठेवियेला पायी । हे चि आता नाही लाज तुम्हा ॥३॥
तुका म्हणे संतीं घातला हावाला । न सोडी विठ्ठला पाय आता ॥४॥

अर्थ :
देवा, माझ्या मनाचा निर्धार झाला आहे. मी जीवावर उदार झालो आहे, हे जाणून घे । । 1। । भगवंता, तुझ्याशिवाय दूसरे कुणाचे पाय मी धरणार नाही आणि तुझ्या प्राप्तिच्या येणाऱ्या भय, शंका, लज्जा अश्या विकारांचा मी त्याग केला आहे । । ध्रु। । देवा, तुझा आणि माझा उपास्य आणि उपासक हा संबंध फ़ार जूना आहे. मात्र संतानी मला तुझ्या स्वादिन करून तो विशेष (अधिक शुद्ध) केला आहे । । 2। । भगवंता, तुझ्या पायावर मी माझा जीवाभाव अर्पण केला आहे. याची पण तुला लाज कशी नहीं बरे ? । । 3। । तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी मला तुझ्या हवाली करुण, माझ्या उद्घारांची सारी जबाबदारी तुझ्यावर सोपावली आहे. विठ्ठला, मी तुझे पाय सोडणार नाही । । 4। ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग