वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(देवाने बाबाजी चैतन्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080679 · अभंग क्र. ३४५५

3455.
(देवाने बाबाजी चैतन्यांचे रूपाने स्वप्नात उपदेश केला त्यासमयीचे अभंग)
घालुनिया भार राहिलो निश्चिंती । निरविले संती विठोबासि ॥१॥
लावूनिया हात कुरवाळिला माथा । सांगितले चिंता न करावी ॥धृपद॥
कटी कर सम चरण साजिरे । राहिला भीवरे तीरी उभा ॥२॥
खुंटले सायास अणिक या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥
तुज वाटे आता ते करी अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥

अर्थ :
कृपाळू संतांवर आपला सर्व भार घालून मी निश्चिंत राहिलो. त्यांनी मला विठोबाच्या स्वाधीन केले. माझ्या मस्तकावर हात ठेवला. माझा माथा कुरवाळला आणि 'चिंता करू नकोस' असे सांगितले. दोन्ही हात कमरेवर ठेऊन साजिर्‍या अश्या समचरणरुपात तो चंद्रभागेच्या तिरावरति उभा आहे. हे केशवा, माझे सारे प्रयत्न कुंठित झाले असल्यामुळे मी तुझे पाय धरले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अनंता, आता तुला जसे वाटेल तसे कर. संतानाच माझी लाज आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग