वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(वाममार्गी शाक्तांचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080447 · अभंग क्र. ३४५७

3457.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
टंवकारूनि दृष्टी लावुनिया रग । दावी झगमग डोळ्यांपुढे ॥१॥
म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥धृपद॥
दीपाचिया ज्योती कोंडियेले तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥
रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥
पडदा लावोनिया दीप चहू कोनी । बैसोनि आसनी मुद्रा दावी ॥४॥
नैवेद्यासी म्हणे करावे पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥
झाला उपदेश कवळ घ्या रे मुखी । आपोशन शेखी बुडविले ॥५॥
पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविका लोकाप्रती ॥६॥
कायावाचामने सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥७॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणे । गुरुत्वभूषणे भोग भोगी ॥८॥
विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥९॥
योगाची धारणा नाही प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥१०॥
वैराग्याचा लोप हरीभजनी विक्षेप । वाढविले पाप मतिलंडे ॥१२॥
तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥

अर्थ :
शाक्तउपासक गुरु आपल्या भोळया शिष्याचे दोन्हीही डोळे आपल्या बोटाने त्याला रग लागेपर्यंत दाबून धरतात आणि नंतर त्याला एकदम डोळे उघडून टवकारुन पाहायला लावतात मग त्या शिष्याच्या डोळयापुढे एक वेगळीच झगमग दिसते व तो भोळा शिष्य त्यालाच ब्रम्ह समजू लागतो. मग ते म्हणतात की शिष्याला समाधी लागली आहे असे खोटे सांगून शिष्याला आणि लोकांना दोघानाही ते फसवतात. एका खोलीमध्ये अनेक दिवे लावतात त्या दिव्यांचा उजेड खोलीमध्ये कोंडून घेतात व शिष्याला रात्रीच्यावेळी हे शाक्तलोक उपदेश करत

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग