काळे-गोरेपण धुतलिया
107.
काळे-गोरेपण धुतलिया जाये ।
दाहकपण काय अग्नि सांडी ॥१॥
तैसे ते प्राक्तन न सोडी सर्वथा ।
ज्ञानियाच्या माथा साट वाजे ॥२॥
शीतलता उदक काय सांडी गुण ।
चंचलत्व मन केवि सांडी ॥३॥
बहेणि म्हणे याचे सागेन विंदान ।
सद्गुरूचरण पाहलिया ॥४॥
