आकार विकार निमाला वि
106.
आकार विकार निमाला विचार ।
एक निरंतर निर्विकल्प ॥१॥
त्वंपद तत्पद असि पदातीत ।
अनादि अनंत अरूप ते ॥२॥
ज्ञान ना अज्ञान अभाव ना भाव ।
आनंदासी ठाव मूळ नसे ॥३॥
बहेणि म्हणे जो हा इतुका तितुका ।
तूचि सर्व लोका अंतर्बाह्य ॥४॥
