आदि मध्य अंत न कळे क
527.
आदि मध्य अंत न कळे कोणासी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥
जया वेवादतीसाही दरुशने । न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ॥२॥
वेडावल्या श्रुति नेती पै म्हणती । तो पुंडलिकाचे प्रीति विटे उभा ॥३॥
एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा सच्चिदानंद भीमातीरीं ॥४॥
