सगुण रूपडें अद्वैत ब
526.
सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे ॥१॥
डोळियांची धणी पहाता न पुरे । मनचि चांचरे पाहता पाहता ॥२॥
रुप आकारलें पुंडलिकाचे भेटी । उभे असे तटी भीवरेच्या ॥३॥
एका जनार्दनी उपाधी निराळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥
