वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

सकळ तीर्थे निवृत्तीच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074235 · अभंग क्र. ५९५

595.
सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी ।
तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥
आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण ।
वृत्तीसी मार्जन केले असे ॥२॥
एकार्णव झाला तरंगु बुडाला ।
तैसा देह झाला एकरूप ॥३॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले नवल केले ।
तारू हरविले मृगजळी ॥४॥

अर्थ :
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे मना, ब्रह्मरूप जे निवृत्तिनाथ त्यांच्यापायी सर्व तीर्थ असल्यामुळे तुही तेथे स्थिर हो. गुरूकृपेने वृत्ति निर्मळ होऊन आता मी देह आहे ही भ्रांती नष्ट झाली. म्हणून सुखाकरीता इकडे तिकडे तिर्थयात्रेकरिता भटकण्याची जरूरी नाही. ज्या प्रमाणे समुद्रावरच्या लाटेला मानलेला भित्रपणा नाहीसा होऊन ती जसी समुद्ररूप होते त्याप्रमाणे या देहाचा मिथ्यात्व निश्चय होऊन मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान मला झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल, त्यानी एक असा चमत्कार करून दाखविला की मृगजळांत मिथ्या नाव नाहीसी व्हावी याप्रमाणे माझा देहात्मभाव नाहीसा केला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग