वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

पहाते पहाणे पहात निर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074216 · अभंग क्र. ५९४

594.
पहाते पहाणे पहात निरुते ।
पाहिलिया तेंथे तेचि होय ॥१॥
तोची तो आपण श्रीमुखे जाण ।
आणिक साधन नलगे काही ॥२॥
भानुबिबेविण निरसले तम ।
ज्ञानदेवी वर्म सांगितले ॥३॥

अर्थ :
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ब्रह्मस्वरूपाकडे पहा. तेच तुझे लक्ष्य असू दे. म्हणजे त्याच्या दर्शनाने तुही तद्रूप होशील. तो परमात्मा तूंच आहेस अशी खात्री तू करून घे. या खात्रीला दुसऱ्या साधनाची आवश्यकता नाही. याप्रमाणे माझ्या श्रीगुरू निवृत्तीरायांनी सूर्योदयावाचून माझ्या ठिकाणच्या अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश केला. असे माउली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग