वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

देहभाव ठेवावे योगभाव

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074219 · अभंग क्र. ५९६

596.
देहभाव ठेवावे योगभाव सेवावे ।
हे बोलणे जाणणे सोय नव्हे गे माये ॥१॥
जिचे मरिजे ऐसे नाही आमुते ।
सांगो कोणाते तुजवांचुनी ॥२॥
देंठीहुनी सुटले जीवनासी आले ।
बापरखुमादेविवरे ऐसे केले गे माये ॥३॥

अर्थ :
देहात्मबुद्धी बाजुला ठेऊन योगाभ्यास करावा हे बोलणे किंवा तसे करणे ही परमात्मप्राप्तीची सोय नव्हे. ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरण धर्म नाहीत. हे श्रीकृष्णा अशा तुझ्या यथार्थ स्वरूप प्राप्तीचा उपाय तुझ्यावांचून आम्हास किंवा आणखी कोणास कोण सांगणार? कारण तू सर्वांचा देव म्हणजे आदि आहेस त्या तुझ्याकडून उपदेश आम्हाला मिळाला असता आम्ही आपल्या जीवनाला म्हणजे परमात्मस्वरूपाला प्राप्त झालो. अशी स्थिती माझे पिता रखुमाईचे पति श्रीविठ्ठल त्यांनी केली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग