वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

निवृत्तीसी नाही प्रा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076166 · अभंग क्र. २१५

215.
निवृत्तीसी नाही प्राक्तनाच बळ ।
अनुभवी केवळ जाणती ते ॥१॥
निर्धारिती आपुले असत्य शरीर ।
मानुनी विचार सार घेती ॥२॥
नाही दंड जैसा निःस्पृही रायाचा ।
तैसा प्राक्तनाचा निवृत्तीसी ॥३॥
बहेणि म्हणे पाहे प्राक्तन वरिष्ठ ।
प्रवृत्ति हे श्रेष्ठ मानी तया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग