सुंदर ते ध्यान मांडि
520.
सुंदर ते ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीती गाये ॥१॥
सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥
सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटीं । पुंडलिकापाठीं उभे असे ॥३॥
सुंदर ते ध्यान एका जनार्दनी । जनी वनी मनी भरलासे ॥४॥
