विटेवरी दिसे स्वानंद
521.
विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानु ॥१॥
कटी पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥
लावण्य रुपडें पाहे पुडंअलीक । आणीक सम्यक नये दुजा ॥३॥
पाहता पाहता विश्रांती पै जाली । एका जनार्दनी माउली संताची ते ॥४॥
