वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

सुनाकुमरी आमुचे घरी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089902 · अभंग क्र. १०२

102.
सुनाकुमरी आमुचे घरी ।
त्यातेही चाळवुनिया निर्धारी ।
लोळे सेजाबाजावरी ।
आणखीही करी काय नेणो ॥१॥
तया नावडतिचि भ्रतार ।
सासासासरे भावेदिर ।
करुनिया यासिची परिचार ।
रतल्या निरंतर याची संगे ॥२॥
खाता जेविता स्मरति याते ।
लेता नेसता यापेंचि चित्ते ।
कामकाजी जैसि भ्रमिते ।
तैसिया उदास वर्तती ॥३॥
यशोदा याणेंचि लाविला चाळा ।
वेडयाचि केल्या सुनाबाळा ।
देखता याचिया श्रीमुखकमळा ।
मग त्या नव्हतचि कोणाच्या ॥४॥
ऐसा चोर हा शिनळ ।
यशोदे आवरी आपुला बाळ ।
येणे बुडविले आमुचे कुळ ।
न कळे आकळ खेळयाच ॥५॥
सांगता हे ऐशी गोष्टी ।
क्रोधची उपजे तुझया पोटी ।
परीहा भला नव्हेचि शेवटी ।
उभ्यकुलां बुडवणा ॥६॥
निळा म्हणे त्यांचि वचने ।
ऐकोनि यशोदा क्रोधे म्हणे ।
काय गे बोल त्या माझे तान्हे ।
बाळक हे नेणे चोया करु ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग