वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

गोवळसंगे चोरिया करी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089889 · अभंग क्र. १०१

101.
गोवळसंगे चोरिया करी ।
शिंकी उतरुनिया बाहेरी ।
आणि फोडी गोवळकरी ।
कवळ देत लोणियाचे ॥१॥
दूध तूप साय लोणी ।
दही हुडकूनिया आणी ।
खाय लवंडी आणि पोरा लागुनी ।
देऊनिया धणी सुखी करी ॥२॥
देउनी समर्थ हा घेणार ।
सर्वी सर्वात्मा ईश्वर ।
म्हणोनिया हा हुडकूनिया घर ।
आणी बाहेरी लपविले ॥३॥
कोठेंहि उरो नेदिचि संचित ।
आणी बाहेरी ते अकस्मात ।
वाढूनि सौगडिया देत ।
आपणहि स्वीकारित त्यांच्यासंगे ॥४॥
देखोनिया ते वृध्द नारी ।
बोभाट करिती यशोदे व्दारी ।
म्हणती गे कुमारा आवरी ।
नव्हाडी केली गोरसाची ॥५॥
नित्य संवकलासे आमुचे घरी ।
धावोनि तो निशीच्या भरी ।
निद्रिस्त असता शिकींचि उतरी ।
आणि गोवळा चारी गोरस ॥६॥
निळा म्हणे न सोसवे आता ।
नित्य उपद्रव याचा होता ।
आणखीही गुह्य गोष्टी सांगता ।
होईल लौकिक आमुचाचि ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग