नाहीचि तुम्हा भीडचाड
103.
नाहीचि तुम्हा भीडचाड ।
येथे करु अल्याति बडबड ।
कृष्ण माझा अवघ्यांसी गोड ।
तुम्हासी का गे वीट याचा ॥१॥
जाऊ नेणेचि बाहेरी ।
तयावरी घालिता गे तुम्ही चोरी ।
आलगटा अवघ्याचि नारी ।
नसतींच गाहाणी आणित्या ॥२॥
घरी काय त्या उणे झाले ।
जे तुम्हा घरी दूध दही चारिले ।
नेऊनिया कोठे सांठविले ।
कृष्ण खणार ते किती ॥३॥
लेंकरु माझे कोडिसवाणे ।
विकारमात्र काहीची नेणे ।
तयासी शिनळ चोर हे म्हणणे ।
फजीत पावणे आहे तुम्हा ॥४॥
जा गे आता धरुनि आणा ।
खोटे शिनळिय येरी श्रीकृष्णा ।
नाही तरी फजीतपणा ।
व्यर्थचि पावाल या बोली ॥५॥
कृष्ण तो अंतर्बाह्य निर्मळ ।
जैसी का शुध्द स्फटिक शीळ ।
तया चोरियेचा लाविता मळ ।
जिव्हा कांटतील तुमचिया ॥६॥
निळा म्हणे परिसोनी येरा ।
क्रोधेंचि चालिल्या आपुल्या घरा ।
म्हणती धरुनिया श्रीवरा ।
आणू तैसाचि इयेपाशी ॥७॥
