वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

दशमद्वार अग्र शून्य

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075138 · अभंग क्र. ३९२

392.
दशमद्वार अग्र शून्य सूक्ष्म गगनी ।
जेथ असे उन्मनी अखिल रूपे ॥१॥
द्विविध भाग पिंडी द्विविध ब्रह्मांडी ।
या ती पडिपाडी ब्रह्मरंध्री ॥२॥
ज्ञानदेव म्हणे शून्यातील रूप ।
अनंत ब्रह्मांडे जेथ आहाती ॥३॥

अर्थ :
दशम द्वार असे जे ब्रह्मरंध्र त्याच्या अग्रभागी एक तेजोमय बिंदु आहे त्या ठिकाणी मनाचा मनपणा विरून गेल्यामुळे उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असते. त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी एक तेजोमय बिंदु आहे. त्याचा अर्धभाग पिंडाचा व अर्धा ब्रह्मांडाचा असतो. हे दोन्ही ब्रह्मरंधात सारखेच असतात. त्या तेजोमय पिंडीत सर्व ब्रह्मांड साठवलेले असते असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग