वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

जडांतील शुद्धांश कौत

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075167 · अभंग क्र. ३९३

393.
जडांतील शुद्धांश कौतुके रिझाला ।
निवृत्तीने दाविला कृपा करूनी ॥१॥
अनुहात भेद दाविला कृपेने ।
सर्व हे चैतन्य गमले तेंव्हा ॥२॥
ज्ञानदेव नयनी निवृत्तीचे पदी ।
आनंद ब्रह्मपदी एक झाला ॥३॥

अर्थ :
जड वस्तुतही शुद्धांश ब्रह्मरूप आहे. हे निवृत्तीनाथानी दाखविल्यामळे या जड वस्तुतील शुद्धांशाच्या ठिकाणी मला आनंद वाटला. श्रीगुरूनी योगाभ्यासा तील अनुहत ध्वनीचा जेंव्हा परिचय करून दिला. तेंव्हा हे जड पदार्थ चैतन्यरूप आहेत अशी माझी खात्री पटली. माझ्या डोळ्यातील श्री गुरूचरणातील व ब्रह्मपदांत असलेला आनंद एकच म्हणजे ब्रह्मानंद ठरला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग