क शासाठी आता करू मी
235.
क शासाठी आता करू मी घोकणी । जिवासी आटणी काय काज ॥१॥
लिहिले संचिती न चुके कल्पांती । वाउगी का श्रांति धरू जीवी ॥२॥
होणार ते होय न होणार ते न होय । वाउगा उपाय शीण मानू ॥३॥
चोखा म्हणे ऐसी उफराटी चाली । आजि म्या देखिली तुमचे घरी ॥४॥
