एकाची फजीती होती ते
234.
एकाची फजीती होती ते पाहती । शाहाणे गुंतती तये ठायी ॥१॥
आपुला आपाण पायी घाली खोडा । मग चरफडा करीतसे ॥२॥
कोसल्याचे परी मानिताती सुख । पुढे निगर्मा दु:ख गांड फाडी ॥३॥
गोडपणे मासी गुंतली लिगाडी । तैसी होय जोडी स्त्री पुत्रा ॥४॥
चोखा म्हणे याचा संग नव्हे बरा । किती फजीतखोरा सांग आता ॥५॥
