(व्यभिचारिणी स्त्रीच
3428.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
दुजा ऐंसा कोण बळी आहे आता । हरी या अनंता पासूनिया ॥१॥
बळियाच्या आम्ही झालो बळिवंता । करू सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । झालो प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)आम्हाला आता अनंतापासून दूर करील असा अनंतावाचून बलवान दुसरा येथे कोण आहे ? सर्वात बलवान असा हरी याच्या आम्ही बायका झालो आहोत त्यामुळे आता आम्हीच सर्वत्र सत्ता करु व सर्वांवर आमची सत्ता गाजवू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता आमच्या जीवावर उदार झालो त्यामुळे तर गोविंदाचे प्रेम आमच्यावर अधिक वाढले आहे.
