वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080491 · अभंग क्र. ३४२७

3427.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
न देखे न बोले नाइके आणीक । बैसला हा एक हरी चित्ती ॥१॥
सासुरे माहेर मज नाही कोणी । एक केले दोन्ही मिळोनिया ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)मी आता कोणालाही डोळयाने पाहाणार नाही, कोणाविषयी काही बोलणार नाही, कोणाविषयी काही ऐकणारही नाही कारण एक हरीच माझ्या चित्तामध्ये बसलेला आहे. मला आता सासर माहेर काहीच राहिले नाही मी दोन्ही एक केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, इतके दिवस आम्ही भांडखोर आहोत असा आळ आमच्यावर आला होता परंतू आता आम्ही ती गोष्ट सत्य करुन दाखवली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग