(व्यभिचारिणी स्त्रीच
3429.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
क्षणभरी आम्ही सोसिले वाईट । साधिले अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागे केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥
तुका म्हणे येणे जाणे नाही आता । राहिलो अनंताचिये पायी ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)आम्ही क्षणभर थोडे वाईट दिवस सहन केले परंतू कधीही न विटणारे नीजसुख प्राप्त केले. मी यापूर्वी अनेक साधने स्वीकारले व पुन्हा सोडून दिले परंतू त्याने हरीची प्राप्ती झाली नाही उलट मला अधिकच दु:ख झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला कोणत्याही प्रकारचे जन्ममरणाचे येरझार राहिले नाहीत कारण आम्ही अनंताच्या पायाशी रममाण झालो आहोत.
