कृष्णमूर्ती होय गे क
150.
कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोय गे । प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगु काय गे ॥१॥
तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे । अर्धांगी रुक्मिणी विंझणे वारित गोपी बाळा गे ॥२॥
पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करिती पुढे निजदास गे ॥३॥
भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे । एका जनार्दनी विटे जोडीयेले पाय गे ॥४॥
