कृष्णाला भुलविले गोप
151.
कृष्णाला भुलविले गोपीने ॥धृ॥
यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥
नंदजी तुमचा कृष्ण लाडका । हाका मरितो मोठ्याने ॥२॥
वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवाने ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेने । नाही ऐकिले मातेने ॥४॥
