वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तुझा भरवसा आम्हा । फ

🙏 3. संत तुकाराम · ABH-080723 · अभंग क्र. ३२२८

3228.
तुझा भरवसा आम्हा । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥
भवसागरसंकटी । तारिशील जगजेठी ॥धृपद॥
नाम आदित्याचे झाड । त्याचा न पडे उजेड ॥२॥
सिलंगणीचे सोने । त्यासी गाहाण ठेवी कोण ॥३॥
नामा सारखी करणी । कोठे नाही त्रिभुवनी ॥४॥
तुका म्हणे देवा । ब्रिद सोडोनिया ठेवा ॥५॥

अर्थ :
पुरुषोत्तमा तुझा आम्हाला फार भरवसा होता. की तू या भवसागराच्या संकटातून हे जगजेठी मला तारशील. अहो जरी झाडाचे नांव सूर्यफुल असले तरी देखील त्याचा उजेड सूर्‍यासारखा पडत नाही. सीमोल्लंघन करण्याच्यावेळी आपटयाची पाने सोने म्हणून वाटतात मग त्या आपटयाच्या पानांना कोणी गहाण ठेवील काय आणि ठेवले तरी कोणाला त्याचे धन मिळणार आहे काय ? म्हणजेच नामासारखी करणी त्रिभुवनामध्ये कोठेही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमचे अनेक ब्रीदे ऐकले आहे पतितपावन, दीनानाथ, अनाथांचा नाथ परंतू त्या नावाला साजेसे कार्य दिसत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे ब्रीद सोडून ठेवा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग