वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

विद्या अल्प परि गर्व

🙏 3. संत तुकाराम · ABH-080570 · अभंग क्र. ३२२९

3229.
विद्या अल्प परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥
अंगी भरे ताठा कोणाते मानीना । साधूची छळणा स्वये करी ॥धृपद॥
साधूचे देहाचा मानी जो विटाळ । त्रैलोकी चांडाळ तोचि एक ॥२॥
संतांची जो निंदा करी मुखी जपे । खतेला सकळ पापे वज्रलेप ॥३॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशी गोविंद नाही नाही ॥४॥

अर्थ :
एखादया मनुष्याला थोडेसे ज्ञान, थोडीसी विद्या प्राप्त होते परंतू त्या ज्ञानाचा विदयेचा गर्व अगदी पराकोटीचा असतो तो मनात म्हणत असतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानी असा कोण आहे ? अभिमानाचा ताठा अंगामध्ये धरतो व त्या अभिमानाच्या ताठेमुळे कोणालाही मानीत नाही साधूचा तर तो स्वत:च छळ करतो. साधूच्या देहाचा म्हणजे साधूच्या चरणांना दंडवत करणे, साधूंना आलिंगन देण्याचा जो विटाळ मानतो तोच एक त्रैलोक्यामध्ये चांडाळ आहे. संतांची निंदा जो मुखाने करतो, व्यर्थ काहीतरी बडबड करतो त्याच्या अंगी सर्व पापे भरलेली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जे असे वाईट प्रवृत्तीचे कपटी मैंद लोक असतात त्यांच्याजवळ गोविंद नाही म्हणजे नाहीच रहात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग