रंगी रंगे नारायण । उ
3227.
रंगी रंगे नारायण । उभा करितो कीर्त्तन ॥१॥
हाती घेउनिया वीणा । कंठी राहे नारायणा ॥धृपद॥
देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥
तुका म्हणे देवा । देई कीर्तनाचा हेवा ॥३॥
अर्थ :
मी उभा राहून किर्तन करत आहे व नारायणाच्या रंगात मी रंगून जात आहे व हे नारायणा तू देखील या रंगात रंगून जावे. हे नारायणा मी हातात वीणा घेऊन हरीकथा करीत आहे किर्तन करीत आहे त्यामुळे तू माझ्यात येऊन राहा जेणेकरुन तुझा उपदेश मी लोकापर्यंत पोहोचवेन. हे नारायणा मी तुझी मूर्ती पाहिली आणि माझ्या ह्दयाला एक विश्रांतीच मिळाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा असाच माझ्या मनाला किर्तनाचा हव्यास असू दयावा.
