जड मुढ अज्ञानी विश्व
38.
जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी । त्याचि तो धावणि केली बापा ॥
गजेंद्र जडजीव स्मरला तुझे नाव । ऐकोनिया धाव घेतली कैसी ॥
भक्ताचा भाव देखोनि पंढरिरावो । करितसे उपाव नाना परि ॥
बोधला म्हणे देव भावाचा भोक्ता । येऱ्हवी सर्वथा नावडे काही ॥
