जडमूढ पाषाण न घडे तु
37.
जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा । पतीत केशवा जन्मा आलो ॥
सदाचा अवगुणी नावडे जनासी । तरी तुवा हृषीकेशी आंगीकारिले ॥
अनंतकोटी आमच्या पातकासी रासी । त्या घातलिया पोटासी पांडुरंगा ॥
माता पितियाची उपमा तुझे देता । लाज माझीया चित्ता वाटताहे ॥
पीतीयाचा पुत्र अपराध करिता । गणती नको दाऊ आमुख आम्हा ॥
आसीयाची उपमा तुजलागी न सहे । तुजवाचुनी कोण आहे थोर देवा ॥
बोधला म्हणे देवा तुवा जगी उध्दारीले । पतीत पावन जैसे केले नाम साचे ॥
