सुखाचिया लागी करितो
174.
सुखाचिया लागी करितो उपाव । तो अवधेंचि वाव दिसो येते ॥१॥
करिता तळमळ मन हे राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेचि सांकडे दिसोनिया आले । न बोलावे ते भले कोणा पुढें॥ ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलो गुऱ्हाडी । सोडवी तातडी यांतूनीया ॥४॥
