साच जे होते ते दिसोन
173.
साच जे होते ते दिसोनिया आले । आता मी न बोले तुम्हा काही ॥१॥
तुमचे उचित तुम्हींच करावे । आम्ही सुखे पाहावे होय तैसे ॥२॥
विपरीत सुपरीत तुमचीये घरी । तुमची तुम्हा थोरी बरी दिसे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हा नवलाव । न कळेचि भाव ब्रह्मादिका ॥४॥
