धना जाट घरी नित्य उभ
485.
धना जाट घरी नित्य उभा हरी । एकनाथा घरी धो-तरे धूत ॥१॥
कबीराची पांजणी करी चक्रपाणी । जनीसवे शेणी वेचू लागे ॥२॥
बोधल्याचे शेत पेरी श्रीअनंत । नामयासांगते केशव हरी ॥३॥
गोर्या कुंभाराची मडकी घडी अंगे । चोखामेळयासंगे ढोरे ओढी ॥४॥
रोहिदासाचे कुंड धुतो श्रीगोपाळ । सांवत्याचा ढोरे ओढी ॥५॥
नामा ह्मणे देव भक्तांचा वल्लभ । मागे पुढे उभा पांडुरंग ॥६॥
