देवा तू जया होसी प्र
486.
देवा तू जया होसी प्रसन्न । तया नलगे कर्मबंधन । निके म्हणती सकळ जन । नीच लोक वंदिती ॥१॥
तुझी दृष्टी कृपा-वंता । जयावरी पडे अनाथनाथा । तया न बाधी संसारव्यथा । सर्वस्व त्याचे हरीसी ॥२॥
माती धरिल्या होय कनक । भोग भोगिती परममूर्ख । नाढळती महादोष । मुखी नाम गर्जता ॥३॥
धन्य धन्य ते संसारी । पुरुष अथवा हो नारी । दरिद्र नाही त्यांचे घरी । तू श्रीहरी सानुकुळ झालिया ॥४॥
ऋद्धि सिद्धि द्वारी वोळं-गती । वैरी दास्यत्व करिती । विषे अमृते होती । तू श्रीपति सानु-कुल झालिया ॥५॥
येथूनि नेसील परते । नामा ह्मणे वैकुंठाते । लक्षा नये चहू वेदा ते । नाना मते धुंडाळिता ॥६॥
