वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

अणिमादि सिद्धि जयाचि

🙏 4. संत नामदेव · ABH-083741 · अभंग क्र. ४८४

484.
अणिमादि सिद्धि जयाचिया दासी । उणे तयापासी काय आहे ॥१॥
आणिकाचे द्वारी सांडोवा पै होसी । धिग्‍ धिग्‍ न लाजसी असे जना ॥२॥
सुलभ सोपारा सेवा माझा स्वामी । म्ह-णता जोडे नामी एक वाचे ॥३॥
अजामेळ वैकुंठा एक नेला नामे । मणिका विमाने स्वये नेली ॥४॥
ऐसा हा कृपाळु आसनी शयनी । न विसंबावा मनी भाग्यवंती ॥५॥
जटायु पक्षियाचे स्वये झाला लेंकरू । त्याचा क्रियापारु केला रामे ॥६॥
शबरीची फळे उच्छि ष्टेंही खाय । ना विसरती पाय कैसे प्राणी ॥७॥
शाहाणिया द्वार-पाळ ह्मणता लाज थोरी । जरी झाला भिकारी न पाहे ॥८॥
तो बळीचा द्वारपाळु सारथी पार्थाचा । तो गोसावी आमुचा देवराणा ॥९॥
गर्भवास तया न होती रे जना । म्हणोनि लोक भजना प्रवर्तले ॥१०॥
अंबऋषिराया सांपडले सायास । साहिला गर्भवास सकळ देवे ॥११॥
उच्छिष्ट होंचि खाता प्रायश्चित्त असे । तो गोपाळाचे कैसे खाय हरी ॥१२॥
त्या सुखा सुरवर जन्म इच्छिताती । म्या अ सा लक्ष्मीपति का न सेवावा ॥१३॥
म्हणोनि सोइरा आन दुजा नाही । गुरुपिता पाही हाचि बंधु ॥१४॥
सज्जन सांगती अनेक नाही आह्मा । कीर्ति वर्णी नामा होऊनि भाट ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग