येरीकडे आनंद गोकुळी
62.
येरीकडे आनंद गोकुळी ।
गोप उठोनि प्रात:काळी ।
मिळले नंदाच्या राऊळी ।
करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥
दसवंती म्हणे गोकुळांसी ।
निद्रित आहे हषिकेशी ।
पुढे जा घेउनी गोधनासी ।
जाग झालिया येईल ॥२॥
काल बहुत श्रमला कृष्ण ।
वात्सेसी करिता संघाटण ।
बळे वांचला सांगती जन ।
केले मर्दन मग त्याचे ॥३॥
तेव्हा कळला तो असुर ।
होउली वत्स आला क्रूर ।
कृष्णे ताडिता निशाचर ।
एक योजन पडियला ॥४॥
ऐकोनि म्हणती गोरक्ष ।
सत्वर पाठवी यदुनायक ।
आम्ही जातो अवश्यक ।
पश्चिम दिशेसी सांगावे ॥५॥
मग ते हाकूनिया खिल्लारे ।
सवेग चालिले एंकाचि भारे ।
चौताळती गोधने थोरे ।
आवेशेंसी धावती ॥६॥
निळा म्हणे नेधती पुढे ।
अवघे पसरिले ते जाभडे ।
तळी महीवरी जेवढे ।
मेघमंडपापर्यंत ॥७॥
