रामा तू माझा जिवलग स
575.
रामा तू माझा जिवलग सांगाती ।
झणी मज अंती अंतरसी ॥१॥
ऐसीये संकटी पावसी न पाहे ।
तरी देह जाये तुझ्या माथा ॥२॥
रायाचे लेकरू रंकाने गांजावे ।
हे तो स्वभावे नवल वाटे ॥३॥
बहिणी म्हणे तुझे ब्रीद काय झाले ।
सांग कोणी नेले हिरोनिया ॥४॥
