वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गुरूवर्णन करिता बोले

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075953 · अभंग क्र. ५७६

576.
गुरूवर्णन करिता बोले ।
सभा देखोनी मुलेबाळे ॥१॥
नाही भेटला सद्गुरू ।
लोकाचारे उपदेश करू ॥२॥
नाना मते सांगे गोष्टी ।
तत्त्वज्ञान बोले नेटी ॥३॥
परि अनुभवते बोल ।
तेथे राहिले सकळ ॥४॥
उपदेश करी जना ।
“गुरू न करी स्त्रीजना” ॥५॥
शूद्र अथवा स्त्रीविरहित जाती ।
जो मानी गुरूस्थिती ॥६॥
“तो जाणावा राक्षस ।
जो घेत स्त्रीउपदेश” ॥७॥
सभेमाजी ऐसे बोले ।
सभा देखोनी मिथ्या जळे ॥८॥
जेथे विकल्प तुटला ।
तेथे वर्णभेद मिथ्या बोला ॥९॥
बहिणी म्हणे ऐशा जना ।
स्वप्नी न करा संभाषणा ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग