म्हणे पुंडलिक देवा श
391.
म्हणे पुंडलिक देवा शिरोमणी |परिसावी विनवणी एक माझी ॥१॥
संसारबंधन तोडी रे दारूण |हे एक मागणे तुजपाशी ॥२॥
पंच महापातकी विश्वासघातकी |त्यासी यमादिकी गांजियेले ॥३॥
ऐसिया पतिता करी रे सनाथ |पुरवी माझे आर्त पांडुरंगा ॥४॥
हेंचि माझे काज अंतरीचे गुज |उद्धरी सहज महादोषी ॥५॥
नामा म्हणे वर दिला नारायणे |विठ्ठलदर्शने मोक्ष जीवा ॥६॥
