वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

श्रोत्र आणि त्वचा चक

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076151 · अभंग क्र. २८०

280.
श्रोत्र आणि त्वचा चक्षु जिह्वा घ्राण ।
ज्ञानेंद्रिये जाण पाच ऐसी ॥१॥
याहुनी वेगळा आत्मा तो निश्चये ।
अनुभवे तू पाहे मनामाजी ॥२॥
वाचा आणि पाद शिश्न आणि गुद ।
कर्मेंद्रिये सिद्ध पाच ऐसी ॥३॥
अंतःकरण मन बुद्धि चित्त चौथे ।
अहंकार येथे पाचवा तो ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस गंध जाण ।
विषय दारूण पाच ते हे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा पंचाविसा शोध ।
तत्पदीचा बोध करी मना ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग