पंचकोश आणि ताप जे त्
281.
पंचकोश आणि ताप जे त्रिविध ।
ईषना प्रसिद्ध हारपल्या ॥१॥
तयासी ब्राह्मण बोलिजेती सत्य ।
विचारोनी तथ्य सांगितले ॥२॥
साही उर्म्या आणि षड्भाव देहीचे ।
विचारेही साचे वोसंतिले ॥३॥
बहेणि म्हणे इच्छेचा निरास हा जेथ ।
ब्राह्मण तो सत्य ब्रह्मवेत्ता ॥४॥
